22 December 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले, तो शिवसैनिकाचा राग होता | महापौरांचं स्पष्टीकरण

Mumbai Mayor Kishori Pednekar

मुंबई, ०३ जून | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, परंतु ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.

ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं” असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. “आरोप करणाऱ्यांनी करत राहावे त्यांचं ते काम आहे, सर्व शहानिशा करुनच टेंडर दिल जाईल. दलाल वगैरे काही नाही, सर्व कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाईल” असं उत्तर महापौरांनी मनसेच्या आरोपांना दिलं.

महापौरांच्या या आक्षेपार्ह भाषेवर विरोधकांनीही आक्षेप नोंदवला होता. मुंबईच्या पहिल्या नागरिक असल्याने लोकांना त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी सुसंस्कृत भाषेची अपेक्षा आहे,” असं भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं होतं. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनीदेखील महापौरांनी आपल्या कार्यालयाचा मान राखला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

 

News English Summary: Mumbai Mayor Kishori Pednekar has given an explanation on the offensive tweet. “The activist tweeted from my mobile. He was angry with Shiv Sainiks, but he was wrong. The activist has been given an understanding, ”said Mayor Kishori Pednekar in a press conference.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar has given an explanation on the offensive tweet news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiMayor(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x