22 January 2025 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडेंची उचलबांगडी; पण का? सविस्तर वृत्त

IAS Officer Ashwini Bhide, Mumbai Metro 3

मुंबई: मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची त्या पदावरून मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांना मात्र अद्याप कोणतीही नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबई मेट्रो रेल्वेसाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड उभारण्यासाठी आरे कॉलनीतील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली होती. भाजपची सत्ता असताना भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्याबाबत मुंबईतील नागरिकांनी विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनेही झाली. परंतु भिडे यांनी आंदोलनाची दखल न घेता, झाडे तोडली.

मेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.

फडणवीस सरकारच्या काळात समाज माध्यमांवर #SaveAareyForest अभियान सुरु असताना त्याला मुंबईकरांचा मोठा पाठिंबा मिळत होता. दरम्यान या अभियानात अनेक राजकीय पक्ष देखील उतरले होते आणि त्यांनी देखील जनसुनावणी पासून सर्वच विषयांवर सहभाग नोंदवून वृक्षतोडीला विरोध केला होता. यामध्ये मनसे अग्रस्थानी होता तर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ह्यांनी सुद्धा ह्या वृक्षतोडीला विरोध केला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ह्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

मात्र त्यावेळी अचानक धक्कादायक घडली आणि अचानक अनेक सामान्य मुंबईकरांचा एक गट मेट्रोच्या समर्थनार्थ हजर झाला आणि आम्ही सामान्य मुंबईकर या वृक्षतोडीला समर्थन करत आहोत असं वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, सरकारच्या मर्जीतले काही अधिकारी व पत्रकार ह्या झाडांच्या कत्तलीला सर्मथन करणाऱ्या हा गटाला सरळ पाठिंबा देत असल्याचं समोर आलं होतं.

त्यावेळी फॅक्टचेक केल्यानंतर एक धक्कादायक बाब पुढे आली होती. कारण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते, आरएसएस संबंधित कार्यकर्ते आणि संघटनांना हाताशी धरून एक वेगळीच हवा निर्मिती करून मुंबईकरांचे #SaveAarey अभियान हाणून पाडण्यासाठी सामान्य मुंबईकर म्हणून मुखवटा घालून आपलीच लोकं पाठवली असल्याचं समोर आलं.

बांद्रा येथील मेट्रोच्या प्रशासकीय कार्यालयाजवळ आरेमधील वृक्षतोड’च्या विरोधात असणारे सामाजिक कार्यकर्ते जमा झाले होते, पण त्याआधीच काही मॅनेज केलेले लोक देखील हजर होते. ह्यांची संख्या अंदाजे ४०च्या घरात होती. मात्र ह्यांना त्यांच्या पक्षासंबंधित प्रसार माध्यमांनी आणि मुंबई मेट्रोच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल ने वारेमाप प्रसिद्धी दिली आणि मुंबईकरांचा वृक्षतोडीला पाठींबा आहे अश्या बातम्या चालविल्या. विशेष म्हणजे याच प्रकल्पाची जवाबदारी असलेल्या अधिकारी अश्विनी भिडे ज्या सामान्य नागरिकांना याच विषयावरून कधीच भेटत नव्हत्या, त्यांनी याच मॅनेज लोकांना विशेष भेट देऊन फोटोसेशन देखील केल्याचं फॅक्ट-चेकमध्ये समोर आलं होतं. तो नियोजनबद्ध घडवलेला प्रकार अत्यंत धक्कादायक होता आणि आंदोलक मुंबईकरांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचं समोर आलं. त्यात SaveAarey अभियानाला कधीच प्रसिद्धी न देणाऱ्या अधिकारी अश्विनी भिडे याच वृक्षतोडीला समर्थन करणाऱ्या लोकांना मुंबई मेट्रो३ या अधिकृत ट्विटर पेजवरून प्रसिद्धी देताना दिसल्या हा ऐतिहासिक योगायोग म्हणावा लागला.

संपूर्ण चौकशी असता हे विशेष मुंबईकर होते कोण ? तुम्हाला माहित आहे का ? तर नाही कारण तुम्हाला ते जागृत आणि प्रामाणिक प्रसार माध्यमचं दाखवणार होते आणि दरबारी मीडिया वेगळंच चित्र निर्माण करत होते. कारण त्यातील सर्व जण हे भाजप आणि RSS ह्यांच्याशी निगडित असल्याचं सिद्ध झालं होतं. त्या खास लोकांना जेव्हा एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अक्षरशः टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालं. त्यातील काहींना तर आपण नेमकं कशासाठी आलो आहोत हेच सांगता येत नव्हते, कारण सगळे उचलून आणलेले होते.

आता त्यात सहभागी असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते ह्यांचा पंचनामा;
१ . भटू सावंत: संस्था – जागृत भारत मंच आणि खरी ओळख मुंबई “तरुण भारत” पेपरचे पत्रकार
२. मधू कोटीयन: संस्था – मुंबई रेल्वे प्रवासी संघ आणि खरी ओळख हि संघटना भाजपच्या रेल्वे आघाडीचा एक भाग आहे
३. भूषण मर्दे: संस्था – मंथन संस्था आणि खरी ओळख संघ स्वयंसेवक
४ .कैलास वर्मा: संस्था – रेल्वे प्रवासी संघटना आणि खरी ओळख भाजप कार्यकर्ते
५ . विशाल टिबरेवाल: संस्थ – ग्रीन ट्रिब्युनल आणि खरी ओळख RSS नमो भक्त
६. नाव माहित नाही मात्र निवेदन देताना एक महिला दिसत आहे जी वांद्रे मधील भाजप कार्यकर्ती आहे.

मुंबईमेट्रो-३ या ट्विटर पेजने ज्या ग्रीन ट्रिब्युनल संस्थेच्या विशाल टिबरेवाल यांना प्रसिद्धी दिली ते स्वतः RSS कार्यकर्ता आहेत. त्याचे खाली पुरावे.

 

Web Title:  Mumbai Metro 3 IAS officer Ashwini Bhide transfer from Mumbai Metro Project.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x