22 December 2024 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

चिमुकलीच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार, चिमुकलीच्या पित्याने मानले आभार

Mumbai Minister Aaditya Thackeray, Birthday

मुंबई, १३ जून: जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात मिळाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवजात बाळाच्या पित्याकडे एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.

घणसोलीमध्ये राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज होते. मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाच्या अर्भकाची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु आहे. परंतू आरजूच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तिचे वडील मुलीला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आरजूच्या आजाराचं निदान लागताच तिच्या वडिलांनी तिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं आहे.

बाळाच्या वडिलांकडे उपचार करुन घेण्यासाठी पैसे नव्हते. त्रस्त पित्याने अनेकांकडे मदतीची याचना केली. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळाल्याने त्याने पित्याची व्यथा आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली. आदित्य ठाकरे यांनी राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अब्दुल अंसारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली. इतकंच नाही, तर यापुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून पित्याने आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

 

News English Summary: A six-day-old baby with three blocks of heart at birth has received a helping hand. Environment Minister Aditya Thackeray handed over Rs 1 lakh to the father of the newborn baby. Aditya Thackeray had appealed to the workers to help the needy by avoiding spending on his birthday.

News English Title: Mumbai Minister Aaditya Thackeray helped infant of six days fighting News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x