6 November 2024 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी, सोमय्यांचा पत्ता कट की दुसरी सेटलमेंट?

Loksabha Election 2019, Kirit Somaiya, Manoj Kotak, BJP, Shivsena

मुंबईः शिवसेना-भारतीय जनता पक्षाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजूनही निर्णय झाला नव्हता. त्यात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यावर पडदा पडला आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या दबावाला झुकून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे मनोज कोटक यांच्या उमेदवारीला शिवसैनिकही अनुकूल आहेत. शिवसेनेनं विरोध केल्यानंतर भाजपाकडून प्रवीण छेडा, प्रकाश मेहता, पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती.

विशेष म्हणजे मनोज कोटक यांनीदेखील स्वतः किरीट सोमय्य्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. परंतु भाजपाचे काही जुने आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देण्यासाठी शिवसेना आक्रमक आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीसंदर्भात झालेल्या चर्चेत शिवसेनेने ३ अटी ठेवल्या होत्या. यापैकी एक म्हणजे किरीट सोमय्या यांची उमेदवारी रद्द करावी, अन्यथा आम्ही सोमय्या यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे अखेर भाजपानं मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, असं असलं तरी किरीट सोमैया इतक्या सहज सर्वकाही देऊन टाकतील अशी शक्यता नसल्याने त्यांना खुश ठेवण्यासाठी पक्ष त्यांना थेट राज्यसभेवर पाठवणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पत्ता कट झाला की दुसरी सोपी सेटलमेंट झाली याची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x