20 April 2025 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

मुंबई महानगरपालिका २०२२ | एकगठ्ठा मतांसाठी भाजप सर्व विधानसभा क्षेत्रात गुजराती सेल थाटत आहेत?

Mumbai Municipal Corporation Election 2022

मुंबई, १३ ऑगस्ट | भारतीय जनता पक्ष एकाबाजूला राज्यातील २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यासाठी राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रा काढण्याचं नियोजन आहे.

त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पदभार घेतलत्यानंतर आता जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांनी पक्षबळकटीचं नियोजन केलं आहे. मुंबईपासून कोककणपर्यंत ही जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे. नारायण राणेंच्या या यात्रेकडे सगळ्यांचाच लक्ष आहे.

नारायण राणे हे १९ ऑगस्टपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत. १९ आणि २० ऑगस्ट असे दोन दिवस ही यात्रा मुंबईत नियोजित आहे. त्यानंतर २१ ऑगस्टला वसई विरार, मग २३ ऑगस्टला दक्षिण रायगड, २४ ऑगस्टला चिपळूणमध्ये जाणार आहे. २५ ऑगस्ट रत्नागिरी आणि २६ ऑगस्टला सिंधुदुर्ग येत, नारायण राणेंच्या या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. मंत्री झाल्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच थेट जनतेपर्यंत जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मध्ये निवडणुकांची तयारी:
शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका २०२२ पार पडणार आहेत. शिवसेनेसाठी त्यावेळी मराठी मतदार अत्यंत महत्वाचा ठरेल तर भाजपसाठी मुंबईतील गुजराती, जैन आणि मारवाडी मतदार महत्वाचा असणार आहेत. मुंबईतील गुजराती, जैन आणि मारवाडी मतदार हा डोळेझाक करून भाजपला मतदान करणार यात कोणताही वाद नाही. तरीही भाजपने एकगठ्ठा मत मिळावी यासाठी मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघात गुजराती समाजाचे सेल स्थापल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे मराठी आमदारही त्यांच्या दावणीला बांधले गेल्याच पाहायला मिळतंय. मुंबईवर आर्थिकदृष्ट्या वर्चस्व गाजवणारा गुजराती-जैन मतदार हा मुंबईवरील राजकीय वर्चस्व प्राप्त करण्यासाठी एकजुटीने मतदानासाठी उतरेल अशी राजकीय शंका उपस्थित होऊ लागली आहे. मात्र भाजपही त्याअनुषंगाने कामाला लागल्याचं चित्र आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Municipal Corporation Election 2022 BJP forming Gujarati Cell in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या