22 January 2025 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपची जोरदार तयारी | शहा-शेलार बैठकीत चर्चा

Mumbai Municipal Election 2022

मुंबई ०८ ऑगस्ट | मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल करण्यासाठी राजधानी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र या सर्व घडामोडीत वांंद्रे पश्चिमचे आमदार तथा भाजपचे मुख्य प्रताेद आशिष शेलार यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा येण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी होताच मुंबई, नवी मुंबई, औरंगाबादसह राज्यातील १० महापालिका तसेच जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सन २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता असून भाजपने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला अनपेक्षितपणे जोरदार झटका बसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतून शिवसेनेची सत्ता उलथवून टाकल्यास राज्यातील एकूण राजकारणाचा नूरच पालटू शकतो. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपच्या दृष्टीने ‘करो अथवा मरो’ची लढाई ठरली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा कालावधी तीन वर्षांचा असून चंद्रकांत पाटील यांची मुदत पुढील वर्षी जुलैपर्यंत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता कमीच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शनिवारी पुण्यात प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही असे स्पष्ट केले आहे. वास्तविक दिल्लीतील हालचालींमध्ये मुंबई मनपा निवडणूक ही केंद्रस्थानी असून स्थानिक नेता म्हणून आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली जाऊ शकते.

२०१७ च्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या स्थानी:
मुंबईत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आक्रमक चेहरा म्हणूनही आशिष शेलार यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई शहराध्यक्षपदावर असताना सन २०१७ च्या पालिका निवडणुकीत शेलार यांनी भाजपला सत्तेनजीक पोहोचवले होते. या निवडणुकीत शिवसेनेखालोखाल भाजपला २७.३२ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेला २८.२९ मते मिळाली होती. त्या वेळी राज्यात भाजप-सेना युती असल्याने भाजपने महापौरपदावरचा हक्क सोडला होता यंदा मात्र हे दोन्ही पक्ष प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकणार आहेत.

मनसेसोबत युतीची शक्यता कमीच:
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केवळ राजकीय खेळ खेळत आहेत, कारण मनसेचा मुंबई-कल्याण-डोंबिवलीबाहेर प्रभाव अगदीच कमी आहे. तसेच मनसेसोबत गेल्यास मुंबईतील भाजपचा पारंपरिक गुजराती, परप्रांतीय मतदार दुखावला जाऊ शकतो. हे भाजपला परवडणारे नाही. शिवाय राज ठाकरेंसारख्या आक्रमक, ‘करिश्माई’ नेतृत्वासोबत जुळवून घेणे आणि त्यांच्या टीकेचा रोख मोदी शहांविरोधात जाणार नाही एवढीच काळजी भाजप नेते घेत आहेत. त्यात मनसेला थोड्याफार जागा मिळाल्यास ते भाजपसोबत जातील याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी आमदार शेलार महत्वाची भूमिका बजावतील असं भाजपाला वाटतंय.

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा मुंबईत प्रभाव नगण्य:
सन २०१७ च्या निवडणुकीत भाजपचा चेहरा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मुंबई निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली होती. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. पहाटेचा शपथविधी, पक्षातील ओबीसी नेत्यांची नाराजी यामुळे फडणवीस यांची प्रतिमाही तेव्हासारखी नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हा पक्षाचा ‘मराठा चेहरा’ असला तरीही आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत भाजपला आलेले अपयश, वारंवार केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये आणि मुंबईतच नव्हे तर आपल्या कोल्हापूर शहरातही त्यांचा प्रभाव नसल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai municipal election 2022 BJP meeting at Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x