28 January 2025 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२२ | भाजपची जोरदार तयारी | 'समर्थ बूथ अभियाना'साठी विशेष रणनीती

Mumbai Municipal Election 2022

मुंबई, १५ ऑगस्ट | शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती.

सादर बैठकीला विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड यांच्यासहित इतरही नेते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी सुरू केलेले “समर्थ बूथ मोहीम” याबाबतही या बैठकीत चर्चा झाली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला धक्का द्यायचा असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला महानगरपालिकेच्या सत्तेतून खाली खेचावे लागेल हे भारतीय जनता पक्षाला चांगलंच ठाऊक आहे. शिवसेनेमुळे राज्यात हातातोंडाशी आलेली भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्याने भाजप याचा वचपा काढण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीची वाट पाहत आहे.

या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पूर्ण रणनीती तयार करण्यात येत आहे. याबाबत ‘समर्थ बुथ मोहीम’ अंतर्गत मुंबईच्या प्रत्येक वार्डवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरचे प्रश्न, त्या वार्डमध्ये असलेल्या लोकांच्या समस्या तसेच महानगरपालिकेमधील गलथान कामासाठी शिवसेनेची असलेली जबाबदारी या मुद्द्यांवर येणाऱ्या काळात भाजप अधिक आक्रमक होताना दिसणार आहे. याबाबतची चर्चा या बैठकीत करण्यात आली असून महानगरपालिकेसाठी भाजपकडून विशेष रणनीती आखली जाणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Municipal Election 2022 BJP Samartha Booth Panel meeting at high level news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x