23 December 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

BMC निवडणूक २०२२? | मुंबईतून युपी-बिहारसाठी आणखी २ स्पेशल ट्रेन देणार - रावसाहेब दानवे

Mumbai Municipal Election 2022

मुंबई, ०६ ऑगस्ट | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही महिन्यांवर आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता मुंबई संबंधित विषयांकडे केंद्रित झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना नियमावलीमुळे सामान्य लोकांसाठी बंद असलेली लोकल ट्रेन आणि मुंबई भाजपचं आजचं आंदोलन त्याचाच भाग असल्याचं म्हटलं जातंय. मात्र आता आपला मतदार कोण आणि त्यासंबंधित राजकारण देखील केंद्रस्थानी आलं आहे.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांचं वास्तव्य आहे. मात्र हा मतदार काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ते भाजप अशा सर्वच पक्षांमध्ये मतदार म्हणून विखुरलेला आहे. मात्र त्यांची संख्या मोठी असल्याने आता भाजपने त्यावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय.

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी यासंदर्भात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मुंबई महानगर प्रदेशात पश्चिम भागात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्पेशल ट्रेन सुरु करण्याची मागणी संजय पाण्डेय यांनी केली होती हा विषय रावसाहेब दानवेंनी पूर्णपणे ऐकला. उत्तर भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी लवकरच आणखी दोन नवीन विशेष ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे संजय पाण्डेय म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Municipal Election 2022 MoS Raosaheb Danve promises to give 2 more special trains from Mumbai To Uttar Pradesh Bihar news updates.

हॅशटॅग्स

#BMCElection2022(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x