'या' वेळेत खुली राहणार मुंबईतील दुकानं; बीएमसीची सुधारीत नियमावली
मुंबई, ९ जून : मागील अडीच महिन्यापासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनंतर अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. मुंबईतील लॉकडाउनबाबत पालिकेकडून आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
मिशन बिगेन अगेन म्हणत राज्य सरकारने लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी २ जून रोजी नियामवली प्रसिद्ध केली होती. याच नियमावलीनुसार मुंबई महापालिकेकडून सुधारीत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधारीत पत्रकानुसार, मुंबईतील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, एका दिवसात एकाच लेनची दुकानं उघडता येणार आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत दुकानं उघडता येतील, रविवारी दुकानं बंद ठेवावी लागणार आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एक सुधारित नियमावली जारी केली आहे. यामध्ये सर्व मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानं पूर्ण वेळ उघडता येणार असल्याचं नमूद केलं आहे. मात्र, यात मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सुरू करण्यास अजूनही परवानगी देण्यात आली नाहीये. मुंबई महापालिकेनं काही अटींचा उल्लेखही केला आहे.
सम- विषम या तत्वावर दुकानं सुरू ठेवण्याचा नियम पालिकेनं कायम ठेवला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी तर दुसऱ्या बाजुची दुकानं दुसऱ्या दिशी सुरू राहतील. तसंच, दुकानदारांनी सोशल डिस्टनसिंग व वाहतूकीची व्यवस्था करावी अशा सूचना पालिकेनं केल्या आहेत. ओपन एअर जिम, गार्डनमधील उपकरणं, बार यांसाठी परवानगी नसल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे.
मुंबई पालिकेच्या सुधारीत पत्रकातील प्रमुख मुद्दे;
- खेळाच्या मैदानांवरील झुला किवा इतर खेळाच्या साहित्याचा वापर करता येणार नाही, ओपन एअर जिमच्या साहित्याचा वापरावर निर्बंध
- दुकानं उघडली जातील, पण रस्त्याच्या एका बाजूची दुकान उघडी ठेवली तर दुसऱ्या बाजूकडील दुकानं बंद ठेवली जावी
- दुकाने पूर्णवेळ(साधारणपणे जितका वेळ असतात) उघडी राहतील
- दुकाने सोमवार ते शनिवार उघडी राहणार तर रविवारी बंद राहतील
- वृत्तपत्रांची घरी डिलिव्हरी करण्यासाठी मुभा, पण मास्क आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांच पालन करावे लागेल
- शैक्षणिक संस्था जसे कॉलेज, विद्यापीठ, शाळामधील कर्मचारी वर्ग आणि शिक्षकांना कामावर जाता येईल पण शिकवण्याच्या कामाव्यरिक्त इतर कामांसाठी
- मुंबईच्या उपनगरातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ये जा करणाऱ्या मजूर, नोकरदारांना कोणत्याही परवानगी आवश्यकता भासणार नाही.
News English Summary: Mumbai, which has been stalled for the last two and a half months due to lockdown, is slowly recovering in the fifth phase of the lockdown. A number of conditions have been relaxed following the suggestion of the Central and State Governments. The municipality has relaxed more conditions regarding lockdown in Mumbai.
News English Title: Mumbai municipality has relaxed more conditions regarding lockdown in Mumbai News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO