19 April 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

आमच्यासाठी कठीण काळ | पण तुम्हा सर्वांच्या सहकार्याने सक्षम पोलीस दल म्हणून काम करु - पोलीस आयुक्त

Mumbai CP Hemant Nagarale, press conference, Sachin Vaze

मुंबई, १७ मार्च: सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर आज बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारत असल्याचं सांगितलंय. मी हेमंत नगराळे, IPS 87 बॅचचा, आताच मी चार्ज घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार्ज घेतला आहे. सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहे, असं देखील हेमंत नगराळे म्हणालेत.

ही समस्या आपण सगळ्यांच्या मदतीने, पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. येणाऱ्या दिवसात जी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला चांगलं करण्याचा आणि आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार आहे.

तो निश्चितपणे मला मिळेल हा विश्वास आहे. आपण सर्वांनी या कार्यात सहकार्य करावं, जेणेकरुन महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं नाव चांगलं होईल. कोणतीही टीका मुंबई पोलिसांवर होणार नाही, अशी परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने, चांगलं सक्षम पोलीस दल म्हणून काम करु, अशी मी ग्वाही देतो.

 

News English Summary: Mumbai Police Commissioner Parambir Singh, who was found guilty in the Sachin Waze case, has finally been transferred and replaced by Hemant Nagarale as the new Mumbai Police Commissioner. So, Parambir Singh has been transferred to the Home Guard.

News English Title: Mumbai Police Commissioner Hemant Nagarale press conference after taking a charge news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या