हा सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न | परमबीर सिंहांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार - गृहमंत्री
मुंबई, २० मार्च: मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता यावर अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करुन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच परमबीर सिंहांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
प्रसिद्धी पत्रक pic.twitter.com/4qh5ZIP9GD
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
अनिल देशमुखांनी काय म्हटले?
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.
- सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
- आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता.
- या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळवताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंह हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
- 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटवले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
- पोलिस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
- परमबीर सिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करत आहे.
स्वतःला वाचवण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे खोटे आरोप केले आहेत. - सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
- स्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
- स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे
मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
News English Summary: Mumbai Police Commissioner Parambir Singh has made serious allegations against Home Minister Anil Deshmukh. He alleged that Anil Deshmukh had given a target of Rs 100 crore to Sachin Vaze every month. Now Anil Deshmukh has issued a famous pamphlet denying all the allegations. He also said that he would file a defamation suit against Parambir Singh.
News English Title: Mumbai Police Commissioner Parambir Singh has made serious allegations against Home Minister Anil Deshmukh news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय