22 January 2025 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

दादर-नायगाव पोलिस वसाहतीतील कुटुंबीय राज ठाकरेंच्या भेटीला

Raj Thackeray

मुंबई, ०९ ऑगस्ट | दादरच्या नायगाव परिसरातील पोलीस वसाहतीतील नागरिकांना घर खाली करण्याची नोटीस अली आहे. पोलिस वसाहत धोकादायक असल्याने या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त केला जात असून विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. दरम्यान पोलिसांचे कुटुंबीय आज याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते. राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आहेत.

चिंता करु नका, पाठपुरावा करु: राज ठाकरे
पोलिस वसाहतीतील लोकांना घर खाली करण्यासाठी नोटीस अली आहे. तिथले नागरिक राज ठाकरेंकडे मदतीसाठी गेले होते. घरं सोडून आम्ही जायचं कुठे असा प्रश्न ते विचारत आहेत. याचसाठी आज पोलिस कर्मचाऱ्यांच्या बायका आणि मुलं आपली व्यथा घेऊन राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना चिंता करु नका सांगत आपण याचा पाठपुरावा करु असं आश्वासन दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचीही भेट:
नायगावच्या नागरिकांची या आधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी या इमारती धोकादायक वाटत नसल्याचं सांगत सरकारने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी केली होती. तसंच निर्णयाला स्थगिती द्या असंही म्हणाले होते. यावेळी त्यांनी रहिवाशांना आपण मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करु असं आश्वासनही दिलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Police family members meet MNS Chief Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x