21 April 2025 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

मुंबई पोलिसांनी आजपर्यंत ११० योद्धे कोरोनामुळे गमावले, तर राज्यात एकूण ४२७ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू

Maharashtra corona pandemic

मुंबई, ०९ मे | राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 82 हजार 266 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213 इतका खाली आला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

देशात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध लागू आहेत. दरम्यान, कोरोना महामारीत मागील वर्षभरापासून डॉक्टरांसोबतच पोलीस दलाचं योगदान देखील फार मोठं आहे. यात खरंतर मुंबई पोलिसांचे आभार मानावे तेवढे कमीच म्हणावे लागतील. कारण देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ११० योद्धे कोरोनामुळे गमावले आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ४२७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ५४ जणांच्या यंदाच्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलीस शहरात गस्त घालणं असो लसीकरण केंद्र असो किंवा मग क्वारंटाइन सेंटर असो अशा सर्व ठिकाणी आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत. यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे कामाचा ताण वाढल्यानं काही पोलिसांना रोज घरी देखील जाता येत नाहीय. लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आलीय त्यामुळे एप्रिल-मेच्या कडक उन्हात त्यांना पहारा द्यावा लागतोय.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील सदस्याला पोलीस दलात नोकरी देण्याचं याधीच जाहीर केलं होतं. पण ही योजना देखील गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून मागे घेण्यात आली आहे.

 

News English Summary: Since April last year, Mumbai police have lost 110 warriors to corona. In Maharashtra, a total of 427 policemen have died due to corona so far. Of these, 54 died in the second wave of corona in April this year.

News English Title: Mumbai Police is the worst affected force in the country when it comes to Covid19 deaths news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या