25 December 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

मनसेच्या 'भगव्या' मोर्चाआधी मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना नोटीस

Raj Thackeray, MNS, Mumbai Police Notice

मुंबई : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

‘चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल,’ अशा नोटीसा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम १४३,१४४ आणि १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत. एकूणच मनसेचा मागील इतिहास पाहता सर्वात शिस्तप्रिय मोर्चे काढण्याचा मनसे सर्वश्रुत आहे. मात्र विषय धार्मिक तेढ निर्माण होण्याचा असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे.

काळेवाडी, रामटेकडी आणि परळगाव येथे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मनसेच्या महामोर्चानिमित्त चौकसभा घेतल्या जाणार आहेत. या आयोजित केलेल्या चौकसभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार किंवा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा शक्यता नाकारता येत नाही. शांतात भंग होऊन कायदा व शांततेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरून आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद केलेली नोटीस धाडण्यात आली आहे. तसेच दादर परिसरात रविवारच्या मोर्चासाठी मनसेची शहारनिहाय जय्यत तयारी सुरु केली असून टेम्पोवर स्पीकर लावून प्रचार सुरु केला आहे.

 

Web Title:  Mumbai Police legal Notice to MNS workers before Raj Thackeray Morcha.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x