22 January 2025 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

मुंबई पोलीस तुमच्यासाठी प्लाझ्माचे दान सुद्धा करत आहेत, तुम्ही सुद्धा पुढे या

Mumbai Police, Donating plasma, Covid19 Treatment

मुंबई, २८ जुलै : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या लवकरच ४ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनाच्या ७ हजार ९२४ नव्या रुग्णांची भर पडली, यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १३ हजार ८८३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी १ हजार १२ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख १० हजार १८२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार १३२ इतका झाला आहे. तर पुण्यात काल दिवसभरात कोरोनाच्या ३ हजार ४४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३८ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजार ७८२ इतकी झाली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा १ हजार ७३७ वर पोहोचला आहे.

दुसरीकडे राज्यातील पोलीस कर्मचारी दुहेरी कर्तव्य बजावताना दिसत आहे. मुंबई पोलीस दलाचे मध्य प्रादेशिक विभागाचे विरेश प्रभू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे, सागर शिंत्रे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोविडवर प्रभावी ठरणाऱ्या प्लाझ्माचे दान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेबरोबर लोकहित जपणाऱ्या पोलिसांचं कौतुक स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे समाजतील इतर घटकांनी देखील स्वतः पुढाकार घेऊन आपल्याच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढे येऊन प्लाझ्माचे दान करण्याची गरज आहे.

 

News English Summary: Mumbai Police officers of Central Regional Division Viresh Prabhu, Sr. PI Vilas Gangawane, Sagar Shintre & many others donated plasma for Covid19 treatment & set an example for the society. I appreciate them leading from the front for public welfare & protection said State Home Minister Anil Deshmukh.

News English Title: Mumbai Police officials donating plasma to fight against covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x