5 November 2024 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका

Mumbai Police, Arnab Goswami, Republic TV journalist, Marathi News ABP Maza

मुंबई, २४ सप्टेंबर: मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख केला आहे.

एनडीटीव्ही आणि एबीपी या दोन वृत्तवाहिन्यांवर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी टीका केली. मुंबईकर पत्रकारांना ‘चाय बिस्कूट खाणारे गरीब पत्रकार’ अशा शब्दांत हिणवले. त्यामुळे ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांनी भाषा आवरती घेण्याची विनंती केली. त्यावर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी आणखी आकांडतांडव केले. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकर पत्रकारांनी ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांना चांगलाच चोप दिला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद वाढणार नाही याची काळजी घेतली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रदीप भंडारी यांना धक्काबुक्की होताना दिसत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकही सुरु होती. पोलीस पोहोचण्याआधीच हा वाद सुरु झाला होता. वाद वाढल्यानंतर पोलीस आणि इतर सहकारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या वृत्तवाहिनीच्या या पत्रकारांची सुटका मुंबई पोलिसांमुळेच झाल्याचं पाहायला मिळालं.

एनडीटीव्हीच्या पत्रकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. एनडीटीव्हीच्या सौरभ गुप्ता यांनी समोरच्या बाजुनं शिवीगाळ व गैरवर्तणूक होत होती, परंतु एनडीटीव्हीच्या पत्रकारांनी परिस्थिती शांतपणे हाताळल्याचे म्हटलं आहे. तसंच, भंडारी यांनीच दाखवलेल्या व्हिडीओमध्येही ते स्पष्ट असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: In the viral video, Pradip Bhandari is seen pushing. At this point a large verbal clash also began. The dispute started even before the police arrived. Police and other co-workers have been seen trying to mediate since the dispute escalated. It was not immediately clear what caused the dispute. However, it was found out that the release of these journalists of the news channel who were hurling insults at the Mumbai Police was due to the Mumbai Police.

News English Title: Mumbai Police protect Republic TV journalist during clashes with other journalist Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x