22 April 2025 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामीला अजून एक नोटीस | काय आहे कारण?

Mumbai Police, Legal Notice, Republic TV, Editor Arnab Goswami

मुंबई, १४ ऑक्टोबर : बनावट टीआरपी घोटाळ्यात (Fake TRP Scam) अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी आणखी एक दणका दिला आहे. सीआरपीसीच्या कलम १०८ नुसार त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल करत मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबावडेकर यांनी अर्णबला १६ ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

नोटीसमध्ये दोन घटनांचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. यात पालघर जिल्ह्यातील साधूंची हत्या आणि वांद्रे येथील लॉकडाऊन दरम्यान प्रवाशांचा जमाव, या मुद्दय़ावरून गोस्वामी आणि त्यांच्या वाहिनीने या घटनांना जातीयवाद रंग देऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला आहे. मुंबईत अर्णब गोस्वामीविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशन आणि पायधुनी पोलीस स्टेशन याठिकाणी या गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अर्णबविरोधात दोन समुदायांमध्ये असंतोष आणि जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे.

रिपब्लिक भारत या चॅनेलवरील पूछता है भारत आणि इंग्रजीतील द डिबेट हे प्राईम टाईम शो अडचणीत आले आहेत. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ आणि द्वेष निर्माण करणारी विधाने यातून केली जात असल्याचं एन.एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. त्याआधारे पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत ही नोटीस बजावली आहे. यासाठी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता न्यायालयात समक्ष हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

 

News English Summary: The Mumbai Police has sent a show cause notice to Republic Television editor-in-chief Arnab Goswami asking him why a chapter proceeding under Section 108 of the Criminal Procedure Code should not be initiated against him. Sudhir Jambavdekar, assistant commissioner of police (Worli division) who has sent the notice, has asked Goswami to remain present before him on October 16. Goswami has two FIRs registered against him in Mumbai. One has been registered at NM Joshi Marg police station earlier while the other is at the Pydhuni police station. Both the offences indicate similar allegations against Goswami of inciting hatred and communal tension between two religious groups or communities.

News English Title: Mumbai Police Sent Legal Notice to Republic TV editor Arnab Goswami News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या