20 February 2025 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक 42 टक्क्यांनी घसरू शकतो, तज्ज्ञांचा अलर्ट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Trident Idea Share Price | ट्रायडंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TRIDENT IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा स्टॉक 52-वीक लो जवळ आला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत, टॉप ब्रोकरेज बुलिश, मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरमध्ये तुफान तेजी, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RVNL EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, महिना 15,000 रुपये पगार असणाऱ्यांना इतकी पेन्शन मिळेल HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन वाढत नाहीत, अशा फंडात वाढतात, 1 लाख रुपयांवर मिळेल 1.74 कोटी रुपये परतावा
x

Mumbai Police | 4500 कोटींची उलाढाल, मुंबई पोलिसांच्या पतसंस्थेत पॅनल्सची निवडणूक मोर्चेबांधणी, सर्व्हेमध्ये उमंग पॅनेल सरस

Mumbai Police

Mumbai Police | तब्बल शंभर वर्षे जुन्या आणि जवळपास ४५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या 30,000 सदस्यांच्या मुंबई पोलिसांच्या पतसंस्थेची निवडणूक उद्या म्हणजे सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून सर्वश्रुत असलेल्या या पतसंस्थेच्या 13 सदस्यांच्या जागेसाठी मुंबई पोलिसांमध्ये कमालीची स्पर्धा असल्याने पोलीस कुटुंबीयांमध्ये या निवडणुकीची चर्चा रंगली आहे.

विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त या पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
3 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई पोलिसांच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या पतसंस्थेची स्थापना करण्यात आली होती. नियमावलीनुसार, मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त या पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र सदर पतसंस्थेतील इतर 13 सदस्यांच्या पदासाठी दर ५ वर्षांनी निवडणूक घेतली जाते. कोविड-१९ काळात निवडणूक घेणे शक्य नसल्याने तत्कालीन उमंग पॅनलला पुढे मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत संपल्याने पुन्हा निवडणूक पार पडणार आहे.

पोलिसांसाठी कमी व्याजदरात कर्ज तसेच इतर सेवासुविधा पुरविण्यात येतात
या पतसंस्थेमार्फत मुंबई पोलिसांसाठी गुंतवणुकीच्या योजना, कमी व्याजदरात कर्ज तसेच इतर आर्थिक सेवा-सुविधा पुरविण्यात येतात. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेच्या 13 सदस्यांच्या पदांसाठी येत्या सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 रोजी निवडणूक पार पडणार आहे. सदर निवडणुकीसाठी मुंबई पोलीस दलातीलच ५ पॅनल एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून सज्ज झाले आहेत.

28 हजार सदस्य मतदानास पात्र
या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 32,000 सदस्यांपैकी 28,000 सदस्य मतदानास पात्र आहेत. प्रत्येकी 13 उमेदवार असलेले 5 पॅनल एकमेकांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले आहेत. सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मुंबईतील एकूण 13 मतदार केंद्रावर पात्र पोलीस सदस्य मतदान करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दलात आणि पोलीस कुटुंबीयांमध्ये या निवणुकीची चर्चा रंगली आहे.

अशी आहेत पाच पॅनलची नावे
या पतसंस्थेच्या निवडणुकीत उमंग, संजीवनी, परिवर्तन, दक्षता आणि समर्थ अशी एकूण पाच पॅनलची नावे आहेत आणि प्रत्येकी 13 उमेदवार प्रमाणे एकूण 65 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी प्रचार सर्व शक्तीनिशी करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व 99 पोलीस ठाणी, विशेष शाखा कार्यालये पोलीस आयुक्त कार्यालयातील विविध विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय तसेच इतर कार्यालये पात्र उमेदवारांनी पिंजून काढली आहेत. त्यामुळे निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

उमंग पॅनेलचं ‘विमान’ उंच झेप घेण्याचा सर्व्हेत अंदाज
सर्व म्हणजे पाचही पॅनेलकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. मात्र प्रचारात आणि चर्चेत आलेलं पॅनेल म्हणजे उमंग असंच म्हणावं लागले. उमंग पॅनेलने मुंबई पोलिसांच्या हिताचे अनेक मुद्दे यापूर्वी मार्गी लावले आहेत. तसेच भविष्यातील योजनांसाठी आश्वासनांची संपूर्ण माहिती सदस्यांना प्रचारात दिली आहे. त्यामुळे या पॅनेलची निशाणी असलेलं विमान उंच भरारी घेण्याचे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्रनामा न्यूजने मुंबई पोलिसांच्या विविध व्हाट्सअँप ग्रुपवर व्हर्चुअल आढावा घेऊन, त्यासोबत मुंबईतील पोलिसांच्या अनेक पोलीस ठाण्यातून या निवडणुकीबद्दलचा सदस्यांचा कल जाणून घेतला आहे. सदस्य उमंग पॅनेलच्या पूर्वीच्या कामगिरीवर देखील समाधानी असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालात उमंग पॅनेलच्या विमानाने उंच झेप घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.

IMG-20250216-WA0002

IMG-20250216-WA0006

IMG-20250216-WA0005

IMG-20250216-WA0004

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai Police(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x