23 December 2024 6:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता? | ऊर्जामंत्र्यांचं ट्विट

Mumbai Power Cut, minister Nitin Raut

मुंबई, १४ ऑक्टोबर : महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं आहे.

महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या कळवा-पडघा वीजवाहिनी क्रमांक१ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा केंद्रातील सर्किट – २ चा वीजपुरवठा बंद पडल्यानं सोमवारी सकाळी १० वाजता मुंबईसह ठाणे, कल्याण व रायगड जिल्ह्यातील काही भागांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सोमवारी रात्रीचे साडेबारा वाजले. भांडुप आणि ठाणे परिसरात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्यानं मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजता तो सुरू करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रेल्वेचा वीजपुरवठा वेगाने सुरळीत केला.

महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट- २ वर होता. मात्र, सर्किट – २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागांत वीजपुरवठा सोमवारी दिवसभर खंडित झाला.

 

News English Summary: Maharashtra energy minister Nitin Raut has said that the possibility of sabotage can’t be ruled out in the power outage incident in Mumbai on October 12. “The possibility of foul play/sabotage can’t be denied in the power outage incident of Mumbai, Thane and Navi Mumbai on Monday,” Raut said in a tweet in Marathi.

News English Title: Mumbai Power Cut minister Nitin Raut Tweet News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x