22 December 2024 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Electricity OFF | डिझेलच्या जनरेटवर रुग्णालयात वीज पुरवठा करण्याची कसरत

Mumbai power cut off, Diesel generator, Covid hospital

मुंबई, १२ ऑक्टोबर : सोमवारी सकाळच्या सुमारास आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच आणि ऐन कार्यालयीन कामांना वेग आलेला असतानाच संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक मुंबई शहरात वीज गेल्यामुळं अनेक कामांमध्ये अडथळे आल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा रुळावर येणाऱ्या रेल्वे सेवेवरही याचा थेट परिणाम झाला आहे.

मुंबईतील वीज पुरवठा दीर्घ काळासाठी खंडित झाल्याने खाजगी रुग्णालयांना रूग्णालये सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. डिझेलच्या जनरेटरवर रुग्णालयाचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र बराच काळ वीज येणार नसल्याने काही रूग्णालयांनी थेट वसई, विरार इथून डिझेल आणले आणि रुग्णांची काळजी घेतली.

बोरीवली पश्चिमेला असलेले हे फिनिक्स हॉस्पिटलमध्ये सध्या कोविड रुग्णांवर इथे उपचार सुरू आहेत. इथले आयसीयू बेड भरलेले आहेत तर काही रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने या रुग्णालयाने जनरेटरवर रूग्णालयातील वीज सुरू केली. मात्र बराच काळ वीज येणार नसल्याचे लक्षात आल्याने जनरेटरसाठी आणखी डिझेलची गरज होती. मुंबईतील वीज पुरवठा बंद असल्याने इथले पेट्रोलपंपही बंद होते. त्यामुळे या रुग्णालयाने थेट वसई, विरारहून डिझेलचा अतिरिक्त साठा मागवला गेला.

दुसरीकडे फिनिक्स हॉस्पिटलचा वीज पुरवठा जवळपास तीन तास बंद होता. आणखी काही तास वीज आली नसती तरी जनरेटरवर रुग्णालय सुरू ठेवण्याची तयारी फिनिक्स हॉस्पिटलने ठेवली होती. मुंबईतील इतर रुग्णालयांनीही रुग्णालयाचा वीज पुरवठा इतर माध्यमातून सुरू ठेवून रुग्णांची काळजी घेतल्याचे फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक सौरभ सांगोरे यांनी ‘प्रसार माध्यमांना सांगितले.

 

News English Summary: Health services, especially in civic-run hospitals, were affected as a result of a power outage across the city on Monday morning. Most civic-run hospitals cancelled minor surgeries. As per medical requirements, hospitals have emergency power backup. All the emergency wards like casualty, Intensive Care Unit (ICU) and Covid-19 centres did have adequate supply of electricity. However, civic-run hospitals like Lokmanya Tilak General Hospital, also known Sion Hospital, BYL Nair, King Edward Memorial hospitals stopped power supply at their OPDs and general wards.

News English Title: Mumbai power cut off Diesel generator helps covid hospital for electricity Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x