22 November 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोडो रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, इस्पितळातील 'त्या' घटनेवर तक्रारीत संशय

Shivsena leader, Nitin Nandgaonkar, Hiranandani Hospital, Death Threat

मुंबई, २१ जुलै : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जात नसल्याबद्दल हिरानंदानी रुग्णालयाच्या प्रशासनाला जाब विचारणारे शिवसेनेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नांदगावकर यांनी याबाबत नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अलीकडंच हिरानंदानी रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं ते चर्चेत आले आहेत. पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात एका करोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. त्या रिक्षाचालकाच्या उपचाराचं बिल आठ लाख रुपये झालं होतं. ते भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाणार नसल्याची भूमिका रुग्णालय प्रशासनानं घेतली होती. हे कळताच नांदगावकर यांनी तिथं जाऊन राडा केला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकांशी त्यांची शाब्दिक वादावादी झाली होती. सुरक्षा रक्षक त्यांच्या अंगावर धावूनही आले होते. त्याचा राग मनात धरूनच ही धमकी आली असावी, असं नांदगावकर यांनी पोलीस तक्रारीत नमूद केलं आहे.

त्यानंतर मी सदर रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यावेळी माझी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की झाली होती. दरम्यान सोमवारी सकाळी मला मोबाइलवर धमकी देणारा फोन आला. तसेच मला शिविगाळ करण्यात आली, असा आरोप नितीन नांदगावकर यांनी केला आहे.

‘यूपी, बिहारवाल्यांना तू काय समजतोस? तुझ्या घरात घुसून तुला तीन दिवसांत मारून टाकू. तुझ्या बायकापोरांना कापून टाकू. तू मला ओळखत नाहीस,’ अशी धमकी संबंधित इसमानं दिली. ज्या मोबाइल नंबरवरून धमकी आली होती, तो मोबाइल नंबर (९९६७१००३३३) देखील नांदगावकर यांनी पोलिसांना दिला आहे. ‘सामाजिक कामानिमित्त मी बराच वेळ घराबाहेर असतो. अशा वेळी माझ्या कुटुंबीयांना काही दगाफटका झाल्यास हा इसम जबाबदार राहील, असंही नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

 

News English Summary: Shiv Sena office bearer Nitin Nandgaonkar and his family have been threatened with death for questioning the administration of Hiranandani Hospital for not handing over the death of a rickshaw puller to his family.

News English Title: Mumbai Shivsena leader Nitin Nandgaonkar receives death threat News Latest Updates.

हॅशटॅग्स

#NitinNandgaonkar(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x