22 November 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

येत्या २४ तासांत मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज

Mumbai Thane Konkan, Heavy Rain, meteorological department

मुंबई, २१ ऑगस्ट: येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी १२० मिमीपेक्षाही जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकणातही सर्वत्र पुढील २४ तास पाऊस सुरुच राहील, असेही कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. जुलै महिन्यात अपेक्षेइतका पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ही सारी कसर भरून काढली आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने या तलावांमध्ये ९० टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच तुलसी, विहार, मोडकसागर आणि तानसा ही धरणे भरली असून सर्वात मोठा पाणी साठवण क्षमता असलेले भातसा धरणही ९० टक्के भरला आहे. तर पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्णपणे भरली आहेत.

 

News English Summary: The meteorological department has forecast torrential rains in Mumbai, Thane and Navi Mumbai areas in the next 24 hours. Deputy Director General of Colaba Observatory Krishnananda Hosalikar tweeted in this regard. It said that moderate to heavy rains are likely in Mumbai, Thane and Navi Mumbai areas.

News English Title: Mumbai Thane Navi Mumbai Record mod to heavy wide spread rainfall in 24 HRS News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x