22 January 2025 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

मुंबईकरांनो उद्या मुंबईतील 'या' विविध ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम

Mumbai, Water supply, cut off, BMC

मुंबई, २२ मार्च: मुंबईच्या काही भागांमध्ये उद्या (23 मार्च) दिवशी पाणीपुरवठा बंद असेल तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवला जाणार असल्याची माहिती बृह्न्मुंबई महानगरपालिकेने अर्थात बीएमसीने दिली आहे. बीएमसी कडून 12 तासांसाठी हा पाणीपुरवठा प्रभावित असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच उद्यासाठी देखील पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई मध्ये पालिकेच्या एस वॉर्ड अर्थात भांडूप भागामध्ये 12 तास पाणी पुरवठा खंडीत असेल तर के-ईस्ट, एच ईस्ट, जी नॉर्थ म्हणजेच दादर पश्चिम, माहीम, धारावी, वांद्रे ईस्ट, अंधेरी ईस्ट या भागामध्ये देखील पाणीपुरवठा पालिकेकडून कमी दाबाने केला जाणार आहे. 23 मार्चच्या सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तास हा पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा कधी आणि कसा प्रभावित असेल?

धारावी:
प्रेम नगर, नाईक नगर, धारावी लूप रोड या भागात सकाळी 4 ते दुपारी 12 कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तर धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, एकेजी नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभार वाडा, संत गोराकुंभार मार्ग या ठिकाणी दुपारी 4 ते रात्री 9 या पाच तासासाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे.

भांडुप:
जय भीमनगर, बेस्ट नगर, आरे रोड परिसर, फिल्टर पाडा भागात सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.

अंधेरी (पूर्व):
चाकाला, प्रकाशवाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी, हनुमान नगर, माटा नगर, शिवाजी नगर, शाहिद भगतसिंग वसाहत, चरत सिंग वसाहत, मुकुंद हॉस्पिटल, लेलेवाडी, इंदिरा नगर,मापखान नगर, टाकपाडा, मापखान नगर, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, साग बाग, मरोळ औद्योगिक वसाहत, रामकृष्ण मंदिर रोड, जे.बी.नगर, बगरखा रोड, कांतीनगर या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच,कबिर नगर,बामणपाडा, पारशीवाडी, तरुण भारत वसाहत,इस्लाम पुरा, विमानतळ क्षेत्र, देऊळ वाडी, पी अँड टी कॉलनी या परिसरात दुपारी 2 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

  • विजय नगर, मिलिटरी मार्ग, वसंत ओएसिस, गावदेवी, मरोळ गाव,चर्च मार्ग, दिल व्हीव सोसायटी, कदम वाडी या परिसरात संध्याकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत पाणीपुरवठा बंद असणार आहे.
  • मुळगाव डोंगरी, एमआयडीसी रोड 1 – 23, यशवंत नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा या परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
  • डीपी रोड, महाकाली नगर , बामण दयापाडा, इन्कम टॅक्स कॉलनी या परिसरात सकाळी 6 ते दुपारी 2 या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
  • पवईतील अँकर ब्लॉक पवई मधील तानसा (पूर्व) सागरी ब 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जल झडप तसेच पवई उच्च स्तरीय जलाशय -1 इनलेटर दुरुस्तीचे काम पालिकेकडून उद्या करण्यात येणार आहे त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर हा परिणाम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

News English Summary: In some parts of Mumbai, the water supply will be cut off tomorrow (March 23) and in some places it will be supplied at low pressure, the BMC said. The BMC said the water supply would be affected for 12 hours. Therefore, the citizens have been appealed to keep the required stock of water for today and tomorrow as well.

News English Title: Mumbai the water supply will be cut off on March 23 in some places news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x