22 December 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

राणेंना 2 सप्टेंबरला नाशिक पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार | जन आशीर्वाद यात्रा स्थगित | हायकोर्टात जाणार?

Narayan Rane

मुंबई, २५ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. मुंबई-कोकण, औरंगाबाद, नाशिक, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राणेंच्या अटकेचे आदेश निघालेल्या नाशिकसह राज्यातील अनेक शहरांमध्ये शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. दरम्यान, राणेंची जनआशीर्वाद यात्रा चिपळूण येथून रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचताच संगमेश्वर तालुक्यात राणे यांना दुपारी साडेतीनच्या दरम्यान ताब्यात घेतले. तिथून त्यांना महाड येथे नेण्यात आले. रात्री ११ वाजेच्या सुमारास महाड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी राणेंना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

राणेंना 2 सप्टेंबरला नाशिक पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार – Nashik police issues notice asking Narayan Rane to present on September 2 :

सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची कलमे राणे यांना लावण्यात आली असून या कलमांखाली अटकेची कारवाई करता येणार नाही, असा सर्वोच न्यायालयाचा निकाल आहे. याच मुद्द्यावर राणे यांना जामीन मिळाला असल्याचे राणे यांचे वकील अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी सांगितले. दरम्यान, राणे यांची जनआशीर्वाद यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. यात्रेचा पुढचा टप्पा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. परंतु जिल्ह्यात बुधवार, २५ ऑगस्टपासून सभा, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राणेंची यात्रा पुन्हा सुरू होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजूनही राणेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता नाशिक पोलिसांनी आपल्याकडे दाखल एका केसमध्ये नारायण राणेंना नोटीस पाठवून त्यांना 2 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. राणेंविरोधात पहिला गुन्हा नाशिकमध्येच नोंदवण्यात आला होता आणि त्यांच्याविरुद्ध येथून वॉरंटही जारी करण्यात आले होते. दरम्यान, राणेंची जन आशीर्वाद यात्रा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. राणे हे त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले 4 खटले रद्द करण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतात.

राणे यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देत हल्ला केला. या हल्ल्यात काही शिवसैनिक जखमी झाले. आता पोलिसांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी 100 हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

राणे आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात:
नारायण राणे हे आज त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे, रायगड आणि जळगाव येथे दाखल केलेले खटले रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतात. काही वेळापूर्वी वकिलांचे एक पथक नारायण राणे यांच्या घराबाहेर दिसली आहे. या संदर्भात आवश्यक कागदपत्रे आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वकील अनिकेत निकम यांचे एक पथक येथे आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nashik police issues notice asking Narayan Rane to present on September 2 news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x