20 April 2025 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

बीकेसीतील कोविड केअर सेंटरच्या दूरवस्थेवरून मुंबई पालिकेचा खुलासा

Covid 19, BMC, BKC Covid care Center, Nature Cyclone

मुंबई, ४ जून: निसर्ग चक्रीवदाळासोबतच काल अफवांचंही वादळ उठलं होतं. काल दिवसभरात अनेक अफ‌वा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अफवांचं वादळ शमवता आलं. त्याचप्रमाणे बीकेसी येथे बांधण्यात आलेल्या कोविड केअर्स सेंटर रुग्णालयाचे नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरली होती. मात्र ही माहिती खोटी असल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे केला आहे.

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत एक हजार बेडची सुविधा असलेलं जम्बो कोविड रुग्णालय वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावर उभारण्यात आलं. या रुग्णालयात काही रुग्णही दाखल झाले होते. मात्र, बुधवारी मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्यानं तेथील रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं होतं. दरम्यान, बुधवारी निसर्ग चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात प्रचंड विध्वंस केला. सुदैवानं मुंबईत हे वादळ आलं नाही. मात्र, या वादळामुळे बीकेसीतील रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरली होती.

मात्र मुंबई महापालिकेने ट्विट करून खुलासा केला आहे, “निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला मोठा फटका बसल्याचा दावा करत अफवा पसरवल्या जात आहे. त्या खोट्या आहेत. वादळामुळे रुग्णालयाच्या कुंपणाचं फक्त थोडं नुकसान झालं आहे. रुग्णालय व्यवस्थित असून, सायंकाळपासून पुन्हा सुरू करता येऊ शकते,” असं बीएमसीनं म्हटलं आहे.

 

News English Summary: News of the damage to the Covid Cares Center hospital at BKC was spread on social media. However, the Mumbai Municipal Corporation has revealed on Twitter that this information is false.

News English Title: Nature cyclone damage to the Covid Cares Center hospital at BKC was spread on social media BMC has revealed on Twitter News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या