निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला; तरी खबरदारी घेणं सुरु
मुंबई, ३ जून: जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करत असतानाच महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकलं असून याठिकाणी तशी १०० ते १२० किमीच्या वेगाने वारे वाहत असून तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अलिबाग आणि मुरुडचा समुद्र प्रचंड खवळला असून रोहा, श्रीवर्धन, माणगाव, पेण आणि खोपोलीलाही बसला असून याठिकाणी घरे, झाडं, इमारतींवरील छप्परे आणि विजेचे पोल अगदी पालापाचोळ्यासारखे पडल्याचे धक्कादायक दृश्य पाहायला मिळत आहे.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती स्कायमेटनं दिली आहे. अलिबागच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यात आहे. इथून ते पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. वादळ मुंबईच्या बाजूनं थोडं पुढे सरकलेलं असलं तरीही हवामान विभागानं दिलेला धोक्याचा इशारा कायम आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असतील.
अलिबागला धडकलेलं वादळ मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त झाल्यानं शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होती. दुपारी एक ते दीडच्या सुमारास अलिबागला धडकलेल्या धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलादेखील बसला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात मोठया पावसाने हजेरी लावली. पाऊस धो धो कोसळत असतानाच वेगाने वाहणारे वारे देखील मुंबईकरांच्या मनस्तापात भर घालत होते. सकाळपासून सुरु असलेला पाऊस कोसळत असतानाच वादळ धडकण्याच्या म्हणजे दुपारच्या वेळी पावसाचा वेग ठिकठिकाणी वाढला. त्यामुळे मुंबईकरांना धडकीच भरली.
News English Summary: Skymet has informed that the threat of nature cyclone to Mumbai has been averted. The cyclone that hit the coast of Alibag at around 1 pm is currently in Thane, Palghar belt. From here it is likely to move towards North Maharashtra.
News English Title: Natures cyclone threat to Mumbai averted But still careful though News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो