23 February 2025 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा | माजी नौदल अधिकाऱ्याची मागणी

Navy Veteran, Attacked By Shivsainiks, Madan Sharma, Demands President Rule

मुंबई, १५ सप्टेंबर : शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले होते. राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर, उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही मदन शर्मा यांनी केली होती. मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. ‘मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,’ असं शर्मा म्हणाले. ‘अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,’ अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर, आज राजभवन येथे जाऊन मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.

दरम्यान, अतुल भातखळकर यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली. तसंच मारहाणीचं समर्थन करणाऱ्या अनिल परब यांनी मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केली.

 

News English Summary: Madan Sharma, the retired Naval officer who was attacked by Shiv Sena workers last week for sharing a cartoon mocking Maharashtra chief minister Uddhav Thackeray, met Maharashtra governor Bhagat Singh Koshiyari at Raj Bhavan on Tuesday. Sharma, accompanied by some Bharatiya Janata Party (BJP) leaders and ex-servicemen, complained to Koshiyari that the Uddhav Thackeray government was treating the suspects with kid gloves.

News English Title: Navy Veteran Who Was Attacked By Shivsainiks Madan Sharma Demands President Rule In Maharashtra Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x