पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आम्ही कोर्टातही जाऊ आणि पुरावेही सादर करु - नवाब मलिक

मुंबई, 28 ऑक्टोबर | क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर (Nawab Malik Vs Sameer Wankhede) करण्यात आला.
Nawab Malik Vs Sameer Wankhede. After Aryan Khan was granted bail, NCP leader Nawab Malik slammed NCB official Sameer Wankhede. Malik criticizes Wankhede for being afraid to go to jail today :
दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत.
दुसरीकडे, आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय. यापूर्वी कालच दोन आरोपींना एनडीपीएस विशेष न्यायालयाने जामीन दिला होता. ज्या प्रकारे फर्जी प्रकरण बनवण्यात आलं, सुरुवातीलाच न्यायालयात त्यांना जामीन मिळाला असता. मात्र प्रत्येक वेळी आपल्या वकिलांद्वारे एनसीबी आपली भूमिका बदलते. त्यांचा प्रयत्न असतो की लोकांना जास्त काल जेलमध्ये कसं ठेवण्यात येईल. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करता येईल. ज्यांनी हे फर्जी प्रकरण बनवलं त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, जे पुरावे आहेत ते सादर करु, असं मलिक म्हणाले.
त्याचबरोबर योगायोग म्हणावा लागेल की, ज्या अधिकाऱ्यांना यांना जेलमध्ये टाकलं. तोच अधिकारी आज जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी हायकोर्टात गेला. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी जो तपास करत आहे तो तपास सीबीआय कडून करण्यात यावा अशी मागणी त्याने केलीय. मुंबई पोलिसांनी सांगितलं की त्यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस दिली जाईल. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जाण्याला घाबरतोय. मला वाटतं की जो फर्जीवाडा त्यांनी केलाय तो आता समोर येत आहे, अशी टीकाही मलिक यांनी केलीय. इतकंच नाही तर मलिक यांनी एक ट्विट करुन ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 28, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Nawab Malik Vs Sameer Wankhede after court granted bail to Aryan Khan.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE