20 April 2025 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

लवंगी फोडताना 'मुंबई बॉम्ब स्फोट'चा चतुरपणे उल्लेख करणाऱ्या फडणवीसांवर उद्या हायड्रोजन बॉम्ब पडणार

Nawab Malik will expose Devendra Fadnavis

मुंबई, 09 नोव्हेंबर | मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस (Nawab Malik will expose Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

Nawab Malik will expose Devendra Fadnavis. Devendra Fadnavis If you bring up the issue of underworld, I will detonate the hydrogen bomb of underworld tomorrow morning, said Nawab Malik :

स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पत्रकार परिषद तापविण्यासाठी जाणीवपूर्वक ‘मुंबई बॉम्ब स्फोट’चा वारंवार उल्लेख:
सदर विषय पत्रकार परिषदेत मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी चतुरपणे वारंवार ‘मुंबई बॉम्ब स्फोट’ हा उल्लख करून विषय गंभीर करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसत होतं. मात्र एकूण छोटा विषय अत्यंत चाणाक्षपणे प्रचंड मोठा असल्याचा आव देखील फडणवीस आणत असल्याचं पाहायला मिळालं. सदर विषयातील माहिती देणारे कुर्ला येथील असून ते व्यक्तिगत रागातून काही अर्धवट माहिती देऊन आले, पण फडणवीसांनी त्याला मोठं स्वरूप देण्यासाठी मुंबई बॉम्ब स्फोटशी जोडण्याचा राजकीय प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, फटाके फुटले नाहीत आवाज झाला नाही, असं नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांचा बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबध असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला. देवेंद्र फडणवीस तुम्ही 1999 ला या शहरात आलात. यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेते होते. त्यांनी देखील अशाचं प्रकारचे अनेक आरोप केले होते. गेल्या 62 वर्षांच्या जीवनात किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 26 वर्षांच्या काळात कोणी आरोप करु शकलं नाही. मात्र, तुम्ही माझ्यावर कवडीमोल दरानं जागा खरेदी केल्याचा आरोप केला. तुम्हाला माहिती देणारे व्यक्ती कच्चे खेळाडू असल्याचा पलटवार नवाब मलिक यांनी केला. मीच तुम्हाला कागदपत्रं दिली असती, असं नवाब मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला:
तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे. मी आज बोलणार नाही. उद्या देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहरात होस्टेज बनवलं होतं याचा उद्या 10 वाजता भांडाफोड करणार आहे.

हायड्रोजन बॉम्ब फोडणार:
देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी वाढवून सांगण्याचा प्रयत्न केला. 62 वर्षात कोणीही आरोप करु शकलं नाही. कोणत्याही यंत्रणेसमोर जायचंय ते जावा. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी जे करायचंय ते करा. सरकारी दप्तरात त्याची नोंद आहे. झुठ बोलो जरा ढंग से बोलो, असा टोला नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा मुद्दा पुढं आणलाय तर मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nawab Malik will expose relation of Devendra Fadnavis with underworld.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या