यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये - आ. रोहित पवार

मुंबई, १७ जुलै : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
दुसरीकडे महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती आधीच जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं होतं की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली होती.
आता त्याच निर्णयाला अनुसरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट यूजीसीकडेच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर भाष्य करताना त्यांनी ट्विट केलं आहे की, “विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा करोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनही राज्यातील परिस्थिती दिलासादायक नाही. करोनाचा प्रसार झपाट्यानं होत असून, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची विनंती यूजीसीकडे करण्यात आली आहे. दरम्यान, याच विषयावर रोहित पवार यांनी ट्विट केले आहेत. “करोनाला घाबरून स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोजी आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. करोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा”, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये.प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडं व्यक्त करतात.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 16, 2020
News English Summary: Rohit Pawar has requested the UGC officials to ask themselves and give a one-time ‘result’ on the subject of exams without seeing the end of students’ patience.
News English Title: NCP MLA Rohit Pawar Appeal To UGC For Cancel University Exam News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO