23 February 2025 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

सर्वांसाठीच लोकल सेवा सुरू करण्यासाठी आ. रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा

NCP MLA Rohit Pawar, Mumbai local, travel to all

मुंबई, १२ जानेवारी: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकलसेवा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी केव्हा सुरु होणार, या प्रतिक्षेत अनेकजण आहेत. मुंबई लोकलने प्रवासावर निर्बध असल्याने सामान्यांना कार्यालयाकडे पोहोचताना मोठी दमछाक करावी लागत आहेत. तसेच प्रवासासाठी अधिक पैसे देखील खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना मुंबई लोकल केव्हा सर्वांसाठी खुली होणार हाच प्रश्न सतावत आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. रोहित पवार यांनी यावेळी अनिल परब यांच्याकडे लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठीचं पत्र परिवहन मंत्र्यांना दिलं. रोहित पवार यांनी अनिल परब यांच्या भेटीचं एक ट्विट देखील केलं आहे.

लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत एपीएमसीमध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली”, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्याबाबत या आठवड्यात घोषणा होणार असून यासाठी सरकार ‘चेन्नई पॅटर्न’चा अवलंब करणार असल्याची बोलले जात आहे. या पॅटर्ननुसार, महिलांना पूर्णवेळ आणि उर्वरीत प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता प्रवास करण्याची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. चेन्नई पॅटर्न म्हणजे महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादीत वेळेत लोकल प्रवासाची मुभा. या संदर्भातील प्रस्ताव आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वप्रथम अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली. आता गर्दीची वेळ टाळून सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्याची दाट शक्यता आहे.

 

News English Summary: Many are waiting to see when the public service, which was closed in the wake of the Covid-19 crisis, will resume for ordinary Mumbaikars. As the Mumbai local is restricted to travel, the common people have to suffer a lot while reaching the office. They also have to spend more money for travel. Therefore, the general public is worried about when Mumbai Local will be open to all.

News English Title: NCP MLA Rohit Pawar initiated for allowing Mumbai local travel to all news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x