22 January 2025 10:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक लोकल प्रश्नावर कोमात | आ. रोहित पवारांचं टीकास्त्र

NCP MLA Rohit Pawar, Railway minister Piyush Goyal, Mumbai local train

मुंबई, १ नोव्हेंबर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेतून ( Western Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून आली आहे. मुंबईत 1 नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ६१० फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)यांनी काल रात्री उशीरा दिली आहे. याशिवाय, वातानुकूलित आणि लेडीज स्पेशल गाड्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मिळून दिवसाला लोकलच्या १४१० फेऱ्या होतात. मात्र, आता ही संख्या २०२० इतकी केली जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सध्या ७०६ लोकल फेऱ्या चालवल्या जात आहे. त्यात ३१४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या १ हजार १० इतकी झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या ७०४ फेऱ्या होत आहेत. त्यात २९६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या आता १ हजार होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांना वगळता इतर प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी आहे. मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो प्रस्ताव अनेक संभाव्य धोके लक्षात घेऊन अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.

दुसरीकडे मुंबई शहरातील लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र याबद्दल राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचा निर्णय झालेला नाही. रेल्वे प्रशासन लोकल सेवा सुरू करण्यास जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करताना राज्यातल्या भाजप नेत्यांचाही समाचार घेतला आहे.

‘श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात,’ अशा शब्दांत रोहित पवारांनी केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे.

 

News English Summary: Surprisingly, the Railway Minister, who was ready to tweet at midnight that the state government had not given details about the workers’ railways, did not take a decision even after four days of reversing the letter. Opponents, who are constantly on the lookout for selfish politics, go into a coma on such a social issue, ‘said MLA Rohit Pawar, who has targeted the ruling party at the Center and the opposition in the state.

News English Title: NCP MLA Rohit Pawar slams railway minister Piyush Goyal over Mumbai local train News updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x