23 February 2025 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

रोहित पवारांचा आरे जंगल दौरा | पर्यावरणप्रेमी आणि आदिवासींशी संवाद | क्रिकेट ते रिक्षातून सफारी

NCP, MLA Rohit Pawar, Mumbai Aarey colony

मुंबई, ११ फेब्रुवारी: राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांनी आज आरेच्या जंगलात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची संवाद साधत विषय सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालवत आमदार रोहित पवारांनी आरे कॉलनी भागात सफारी केली. त्यानंतर वृक्ष रोपण करून रोहित पवारांनी क्रिकेटचा आनंद देखील अनुभवला.

मुंबई मेट्रो कारशेड आरेच्या जंगलात नसावी, अशी मागणी करत पर्यावरणप्रेमींनी आरे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यांच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या आहेत. स्थानिक आदिवासींच्या घराच्या प्रश्नांवर सरकारच्या SRA योजना राबवत आहेत. ती देखील थांबवली गेली पाहिजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी यावेळी आमदार रोहित पवारांकडे केली.

आमदार रोहित पवार यांनी ‘वॉक द टॉक’च्या संवादांमध्ये पर्यावरणप्रेमी, आदिवासी यांना आपण मार्ग निश्चित काढू असे आश्वासनही दिलं. रोहित पवार यांनी आश्वासन दिलं की महाराष्ट्र सरकार आरे जंगल वाचवणार आणि त्यासाठी इथे आपण झाड लावलं आहे. “मेट्रो कारशेड संदर्भात निश्चित मार्ग काढू, परंतु केंद्र सरकारने मेट्रोच्या कारशेडचं राजकारण करु नये. राज्य सरकारशी सहकार्य करावं. कुठल्याही पद्धतीचा अहंकार याबाबतीत ठेवू नये” अशी टीका देखील रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केली.

 

News English Summary: NCP MLA and youth leader Rohit Pawar toured the forest of Aarey today. This time, he tried to understand the subject in detail by interacting with environmentalists and local residents. Driving a rickshaw, MLA Rohit Pawar went on a safari in Aarey Colony area. After that, Rohit Pawar also enjoyed cricket by planting a tree.

News English Title: NCP MLA Rohit Pawar visited Mumbai Aarey colony news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x