22 November 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा; मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर नेहमीच सहकार्य करू

NCP MLA Rohit Pawar, Amit Thackeray

मुंबई : शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन नव्याने राजकारणात एण्ट्री करत महत्वाच्या पदावर गेलेल्या अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज गोरेगाव येथे पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याची अधिकृतपणे पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसा अधिकृत प्रस्ताव मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला.

दरम्यान, “महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील”, असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान, यापूर्वीही रोहित पवार आणि अमित ठाकरे या दोघांची लोअर परळ येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीमुळेही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

तत्पूर्वी उपस्थितांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘आतापर्यंत मला जे प्रेम आणि प्रतिसाद दिलात तो यापुढेही द्याल, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या आशीर्वादानं शिक्षण ठराव मी तुमच्यासमोर मांडतो आहे. परवडणारी आणि गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. लहान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात जागतिक स्तराचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत शिक्षण ठराव मांडला आहे.

महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्याचं अनावरण झालं आहे आणि त्यानंतर उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

 

Web Title:  NCP MLA Rohit Pawar wish Amit Thackeray as a friend on personal level.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x