21 November 2024 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

एल्गार: सत्य बाहेर येण्याच्या भीतीने ‘एनआयए’कडे तपास दिला; पवारांचा केंद्रावर आरोप

NIA, Bhima Koregaon, Koregaon Bhima, Sharad Pawar

मुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित तपास राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी’कडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात NIA कडे तपास दिला आहे,’ असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेवत अनेका कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण कारवाईवर शरद पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी पत्र दिले होते. त्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला. त्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईची फेरतपासणी होणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले. जस्टीस पी. बी. सावंत, निवृत्त न्यायमूर्ती कोळसेपाटील आणि असंख्य कार्यकर्त्यांनी या कारवाईबाबत आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणात अनेकांना अटक झाली आहे. अनेकांना नक्षलवादी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले सत्यावर आधारित नाहीत, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्या वेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी निवेदन करतान माओवादी किंवा लक्षलवादी असा शब्द प्रयोगही केलेला नव्हता. हे लक्षात घेता याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, असे पवार म्हणाले.

राज्य सरकारकडून एखाद्या प्रकरणाची चौकशी काढून घेण्याचे अधिकार केंद्राला आहे. खरे सांगायचे तर हा अधिकार गाजवायचा नसतो. मात्र, त्यांनी ते केले आहे. यासाठी न्यायालयात जायची गरज नाही. राज्याला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी घटनेने अधिकार दिलेले असतात, असा सूचक इशारा शरद पवार यांनी दिला.

 

Web Title:  NCP President Sharad Pawar criticizes central government over inquiry of Bhima Koregaon Case to NIA.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x