15 January 2025 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकली, पवारांची कबुली

NCP President Sharad Pawar, interview, Ek Sharad Sarva Garad, Sanjay Raut

मुंबई, १३ जुलै : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत दावा केला होता की, सत्ता बनवण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती, २०१४ च्या सत्ताकाळातही राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तशारितीने बोलणी सुरु होती. त्यावर शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकल्याचं कबूल केले.

याबाबत शरद पवार म्हणाले की, शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असं भाजपाचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते, आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले, पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी म्हणून माझ्या कानावर निरोप आला. त्यावेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे आपल्या पक्षाबद्दल आणि आपल्याबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वत: पार्लामेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ पार्लामेंटमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत. त्यांना सांगून गेलो की, मी पंतप्रधानांना सांगायला जातोय, मी परत आलो, त्यावेळी राऊत तिथेच होते, त्यांच्या कानावरही मी पंतप्रधानांबरोबरची चर्चा घातली.

पुढे शरद पवार म्हणाले की, ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. सत्तेचा गैरवापर करत आहेत हे सरळसरळ दिसतंय. ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसंच काही राज्यांची सत्ता भाजपाकडे होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचं धोरण भाजपाशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारलं नाही.

त्या काळात ज्यावेळी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत बैठक असे त्यावेळी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दोन दिवस आधी होत असे. त्या बैठकीत देशाच्या पंतप्रधानांबाबत अत्यंत कठोर शब्दात नरेंद्र मोदी टीका करत असत. याआधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री इतक्या कठोर शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतो हे आम्ही पाहिलं नव्हतं.

 

News English Summary: Sharad Pawar has commented in the match interview. He admitted that he had deliberately taken steps to widen the gap between Shiv Sena and BJP.

News English Title: NCP President Sharad Pawar interview Ek Sharad Sarva Garad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x