23 December 2024 12:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

शरद पवार हेच राज्य चालवतात | उद्धव ठाकरेंना बोलून काहीच उपयोग नाही

NCP President Sharad Pawar, CM Uddhav Thackeray, MLA Chandrakant Patil

मुंबई, २९ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आजही राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले. यावरून शरद पवार हेच राज्य चालवतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचे कंत्राट घ्या, असा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये करार झाला असावा. सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचे अशी नागरिकांची भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे.

 

News English Summary: The governor asked Raj Thackeray to consult NCP supremo Sharad Pawar. From this, Sharad Pawar runs the state. There is no point in talking to Chief Minister Uddhav Thackeray, said BJP leader Chandrakant Patil.

News English Title: NCP President Sharad Pawar is ruling the state not CM Uddhav Thackeray said MLA Chandrakant Patil News updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x