22 February 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

अखेर खडसे पवार भेटीच्या वृत्तावर स्वतः शरद पवारांनी खुलासा केला

NCP President Sharad Pawar, BJP Leader Eknath Khadse

मुंबई, ७ ऑक्टोबर : पक्षांतर्गत अन्याय झाल्यामुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. खडसे आज बुधवारी मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांच्या भेटीच्या शक्यतेचा खडसे यांनी इन्कार केला असला तरी राजकीय गोटात खडसेंची मुंबईवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून एकनाथ खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी नाकारल्यावर व नंतरही त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. अलीकडेच राष्ट्रवादीतही खडसेंचे स्वागत करू, अशी भूमिका नेत्यांनी घेतली. त्यामुळे खडसेंविषयी खूप चर्चा सुरू आहेत. पक्षाकडून अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यांनी अलीकडे आपल्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

दरम्यान शरद पवार यांनी एकनाथ खडसे भेटीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भेटीचं वृत्त फेटाळलं आहे. न्यूज १८ शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शरद पवारांना एकनाथ खडसेंसोबत भेट होणार का ? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट नाही”. दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

 

News English Summary: There is talk that senior BJP leader Eknath Khadse, who is upset over injustice within the party, will join the NCP. As Eknath Khadse is in Mumbai on Wednesday, he is expected to meet NCP president Sharad Pawar in Mumbai. Although Khadse has ruled out the possibility of a meeting with Sharad Pawar, Khadse’s Mumbai visit has become a topic of discussion in political circles.

News English Title: NCP President Sharad Pawar on Meeting with BJP Leader Eknath Khadse Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x