26 December 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

VIDEO - संजय राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

NCP President Sharad Pawar, MP Sanjay Raut, Devendra Fadnavis, Meeting

मुंबई, २९ सप्टेंबर : तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल २ तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिलं होतं.

या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं, ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली असं दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं, मात्र २ तासांच्या बैठकीमुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात निर्माण झालेली दरी कुठेतरी कमी होण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसली, आगामी काळात शिवसेना-भाजपा एकत्र येतील अशीची चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरु झाली.

या मुलाखतीबाबत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय राऊतांना पहिली मुलाखत माझी घेतली, त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं, यानंतर मी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार, भाजपा नेत्यांची मुलाखत घेणार आहे, वृत्तपत्रांनी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांची मुलाखत त्यांच्या पत्रकारांनी किंवा संपादकांनी घेतली तर लगेच त्याची तडजोड पक्षासोबत होत नाही, त्यामुळे अधिक भाष्य करण्याची गरज नाही, मुलाखत घेतील, वृत्तपत्रात छापतील पण त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

News English Summary: When asked by reporters about the interview, Sharad Pawar said, “I first interviewed Sanjay Raut. He said in that interview, ‘After that I will interview Uddhav Thackeray, I will interview BJP leaders. It does not happen with the party, so there is no need to comment further, they will be interviewed, printed in the newspaper but it will not affect the politics of the state, he said.

News English Title: NCP President Sharad Pawar statement over MP Sanjay Raut and Devendra Fadnavis meet Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x