26 December 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

तिच्या वादग्रस्त वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नव्हती | पालिकेच्या कारवाईने पब्लिसिटी मिळाली

NCP Sharad Pawar, BMC, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, ९ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्यानंतर, तसंच मुंबई पोलिसांवरील तिच्या वक्तव्यानंतर, अनेक माध्यमातून कंगनावर टीका होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच वक्तव्य केलं आहे. अशा वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देतोय, अशी वक्तव्य लोक गांभीर्याने घेत नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी म्हटलं आहे की, “कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल”.

दरम्यान कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये”.

 

News English Summary: The Mumbai civic body’s demolition drive at Kangana Ranaut’s property has given “unnecessary publicity” to the Bollywood actor, who is engaged in an escalating row with the Maharashtra government over her “Mumbai feels like PoK” remark, Nationalist Congress Party chief Sharad Pawar, whose party is part of the ruling alliance with the Shiv Sena, said today.

News English Title: NCP Sharad Pawar On BMC Kangana Ranaut Maharashtra Government Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x