22 December 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीवरून टीका होताच स्पष्टीकरण प्रसिद्ध

NCP state president jayant patil, Actor Sharad Ponkshe

मुंबई, 24 जून : नथुराम गोडसे नाट्य साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे’ अशा शब्दात जयंत पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.

शरद पोंक्षेच्या भेटीनंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून खुलासा केला आहे. “महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हे देखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं बॅकस्टेज कलाकारांना करोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Actor Sharad Ponkshe, who is playing the role of Nathuram Godse, was present at the NCP program. Finally, NCP state president and state water resources minister Jayant Patil has revealed this.

News English Title: NCP state president and state water resources minister Jayant Patil has revealed statement over Sharad Ponkshe presence News Latest Updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x