11 January 2025 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

वरळी विधानसभा; मिशन आदित्य जोमात!; राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार?

NCP, NCP Mumbai, MLA Sachin Ahir, Former MLA Sachin Ahir, Shivsena, Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Aaditya Thackeray, Sharad Pawar, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकावर एक राजकीय धक्के बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सपाटा लावला होता, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात प्रतिनिधी म्हणून धाडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वरळी किंवा शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची दाट शक्यता आहे.

त्या अनुषंगाने शिवडी येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार बाळा नांदगावकर विधानसभा लढवणार असल्याने शिवसेना कोणताही धोका पत्करणार नाही अशी शक्यता आहे. दरम्यान बाजूच्या वरळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांचा मोठा दबदबा असून कार्यकर्त्यांचे जाळे देखील आहे. त्यामुळे येथून सचिन अहिर यांनाच पक्षात आणून वरळी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचं मैदान आदित्य ठाकरे यांच्यासाठी पोषक करण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मिशन आदित्य’साठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शक्ती पणाला लावल्याचे समजते.

त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष आणि माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक आणि अमरावती आमदार देखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करतील, असे बोलले जात आहे.

सचिन अहिर हे मुंबई राष्ट्रवादीचा मोठा चेहरा समजला. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. काँग्रेस-एनसीपीच्या सरकारमध्ये ते गृहनिर्माण राज्यमंत्री होते. एनसीपीचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सचिन अहिर यांच्यामागे तरुणांची मोठी फळी असल्याचं दरवर्षी दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळतं. त्यामुळे सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडली तर ते पक्षासाठी मोठं भगदाड असेल. सचिन अहिर यांच्या या प्रवेशाला सचिन अहिर युवा फाऊंडेशनने पाठिंबा दिल्याच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वी शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. एनसीपी’चे संस्थापक सदस्य असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी देखील लोकसभा निवडणुकीनंतर शिवबंधन बांधलं होतं.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x