23 April 2025 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार; मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB
x

तेव्हा 'वाघ झोपला होता'; नेटिझन्सकडून सेनेच्या निवडणूकपूर्व 'इशारा मोर्चाची' खिल्ली

Shivsena, Netizens, Troll, Social Media, Facebook, Shivsena, Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Kisan Morcha, Assembly Election 2019

मुंबई : मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.

याच पीक कंपन्यांची कार्यालयं मुंबईमध्ये पहिल्यापासून असून देखील शिवसेनेला नेमका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा पुळका आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राज्यातील शेतकरी मागील ५ वर्ष अनेक कारणांवरून मोर्चे आणि धरणं आंदोलनं करत आहेत, तेव्हा शिवसेना कुठे होती अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. त्यामुळे नेटिझन्सनी देखील ‘तेव्हा वाघ झोपला होता’ अशी शिवसेनेची खिल्ली उडवणारी व्यंगचित्र व्हायरल करून हा मोर्चा केवळ निवडणुका तोंडावर आल्याने आयोजित करण्यात आला आहे असं म्हटलं आहे.

आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून मोर्चाला सुरुवात होणार असून विमा कंपन्यांवर हा मोर्चा धडक घेईल. उद्धव ठाकरे सुरुवातीपासून मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्यांची जाहीर सभाही होणार आहे.

शिवसेना सत्तेत सहभागी असताना देखील रत्यावर उतरत असल्याने उद्धव ठाकरे यांना नेमक काय दाखवायचं आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान पीक विमा योजना चांगली आहे, परंतु योजनेचा लाभ तळगाळात पोहचत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हा इशारा मोर्चा निघणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या