22 December 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

सचिन वाझेंच्या गाडीतील ती नोटा मोजण्याची मशीन त्यांची नव्हे | संबंधित महिलेला अटक

NIA, woman arrested, Sachin Vaze

मुंबई, ०२ एप्रिल: अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासोबत दिसलेल्या ‘महिलेचं’ रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे (NIA) पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अँटेलिया स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलिसमधील निलंबित अधिकारी सचिन वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तीच ती महिला असल्याचं वृत्त आहे. NIA ने काल संध्याकाळी या महिलेला ताब्यात घेतलं आहे, जी १६ फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये सचिन वाझेसोबत दिसली होती.

NIA टीमने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दक्षिण मुंबईतील एका हॉटेल आणि क्लबचा तपास केला. त्याशिवाय ठाणे येथील फ्लॅटमध्येही सर्च ऑपरेशन केले. त्याठिकाणी या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. माहितीनुसार, ही महिला मुख्य आरोपी सचिन वाझेची निकटवर्तीय आहे, तिला ताब्यात घेतलंय, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं, जी सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये दिसली होती, ताब्यात घेण्यापूर्वी या महिलेची चौकशी करण्यात आली.

NIA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही महिला सचिन वाझेचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी काम करत होती, ती दोन ओळखपत्रांचा उपयोग करत हे काम करत होती, आणि तिच्याकडे नोटा मोजण्याची मशीनही होती, जी मागच्या महिन्यात सचिन वाझेच्या मर्सिडीजमध्ये आढळली होती.

 

News English Summary: NIA officials said the woman was working to launder Sachin Vaze’s black money, using two IDs, and a note counting machine, which was found in Sachin Vaze’s Mercedes last month.

News English Title: NIA officials said the woman arrested was working to launder Sachin Vaze’s black money news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x