16 April 2025 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

राइनोप्लास्टी, हेअर इम्प्लांट करणाऱ्या सर्जनची अमृता फडणवीसांनी फसवणूक केली | खऱ्या असाल तर बिल पेमेंट्स दाखवा - निशांत वर्मा

Nishant Varma Vs Amruta Fadnavis

मुंबई, १० नोव्हेंबर | नवाब मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हा आरोप करताना मलिक यांनी जयदीप राणा आणि अमृता फडणवीसांचा फोटोही व्हायरल केला होता. त्यावर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. हे प्रत्युत्तर देताना त्यांनी नवाब मलिक यांचा दोनदा बिगडे नवाब (Nishant Varma Vs Amruta Fadnavis) असा उल्लेख केला होता.

Nishant Varma Vs Amruta Fadnavis. Amruta Devendra Fadnavis cheated a cosmetic surgeon who did her Rhinoplasty, Blepharoplasty and Hair Implant, while Hubby was CM.Prove Me Wrong by producing Bill Payments (if any today, by 6pm), or else dont come tomorrow with Fake Details :

पुढे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील. त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला, असा हल्ला अमृता फडणवीस यांनी केला होता.

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची बिगडे नवाब अशी निर्भत्सना करणाऱ्या अमृता फडणवीस यांना मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा सवालच निलोफर मलिक खान यांनी अमृता फडणवीस यांना केला आहे.

निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. तुमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नसेल तर तुम्हाला मलिक यांच्या पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. सत्य जर तुमच्या बाजूने आहे तर भीती बाळगू नका. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील, असा टोला निलोफर यांनी लगावला आहे.

दरम्यान, यापूर्वी अमृता फडणवीस यांच्या रिव्हर ऍन्थम संबंधित फायनान्सर जयदीप राणा या विषयाची सर्वात प्रथम पोलखोल राजकीय विश्लेषक आणि टीव्ही डिबेट पॅनलिस्ट निशांत वर्मा यांनीच केली होती आणि नवाब मलिक यांनी त्यावर भाष्य केलं होतं आणि त्यानंतर विषय तापला होता. आता पुन्हा त्याच निशांत वर्मा यांनी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

निशांत वर्मा यांनी काय म्हटलंय?
यासंदर्भात त्यांनी ट्विट करताना थेट अमृता फडणवीस यांचं नाव घेत आरोप आणि प्रश्न केला आहे की, “पती मुख्यमंत्री असताना, अमृता देवेंद्र फडणवीस यांनी एका कॉस्मेटिक सर्जनची फसवणूक केली, ज्याने त्यांची राइनोप्लास्टी, ब्लेफेरोप्लास्टी आणि हेअर इम्प्लांट केले”. तुम्ही खऱ्या असाल तर बिल पेमेंट्स (आज असल्यास, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) तयार करून मला चुकीचे सिद्ध करा आणि बनावट तपशीलांसह उद्या येऊ नका.”

अमृता फडणवीस यांनी काय प्रतिउत्तर दिलं?
यावर निशांत वर्मा यांच्याकडून स्वतःवर करण्यात आलेल्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांवर उत्तर न देता त्या संतापल्याचं पाहायला मिळतंय. अमृता फडणवीस यांनी थेट निशांत वर्मा यांना प्रतिक्रिया देताना आणि मुंबई पोलिसांना मेन्शन करताना म्हटलंय की, “जेव्हा एखादी महिला बिगडे आणि खोडकर यांच्या विरोधात बोलते, तेव्हा हे राक्षस तिला खाली पाडण्याचा कट रचतात. ते तिच्या कुटिल तस्करांद्वारे तिचे मानसिक शोषण करतात जे तिच्या चारित्र्याची हत्या करतात आणि तिच्या शरीरावर कुरूप टीका करतात. अशा मुखवटा घातलेल्या गुन्हेगारांच्या उजव्या हातांना शिक्षा होईल का?”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nishant Varma Vs Amruta Fadnavis twitter war.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या