24 November 2024 7:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

घुसखोरांविरोधातल्या आंदोलनाचं श्रेय इतरांनी घेऊ नये; उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

MNS Chief Raj Thackeray, CM Udhav Thackeray

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या महाअधिवेशनात झेंडा बदलल्यानंतर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका जाहीर केली होती. आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाही काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घुसखोरांच्या प्रश्नावर ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, घुसखोरांचा विषय हा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. शिवसेनेने त्यांच्या विरोधात आंदोलनही केलंय. घुसखोरांना देशाबाहेर हाकललेच पाहिजे. घुसखोरांविरोधातल्या आंदोलनाचं श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोलाही त्यांनी राज ठाकरेना लगावला.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा आता हिंदुत्वाची वाट धरली आहे. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबतची वर्षानुवर्षाची युती तुटण्याच्या प्रश्नावर बोलत असताना, मुलाखतकार संजय राऊत यांनी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत प्रश्न विचारला. “भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला. कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकललंत…आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसलं हिंदुत्व आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना नको ते पक्ष म्हणजे तुम्ही ‘मनसे’विषयी म्हणताय का? वृत्तपत्रांतल्या बातम्यांनुसार असं कळतंय की, हे दोन पक्ष एकत्र येताहेत. त्यावर उद्धव यांनी तो विषय गौण आहे असे उत्तर दिले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार ९ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. याआधी मोर्चाचा मार्ग भायखळा ते आझाद मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title:  No One should take a credit expelling Pakistani Bangladeshi intruders CM Uddhav Thackeray comment Raj Thackeray.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x