21 February 2025 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

अश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप'नीतीचं ट्विटरवर गुणगान

Mumbai Metro 3, Aarey Colony, Metro Car Shade, Ashwini Bhide

मुंबई : कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणेच आरे मेट्रो कारशेडही जाणार, अशी विरोधी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतरही आरेमध्येच कारशेड होईल, दुसरी जागाच नाही, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्याबाबत बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती सूचना मागिवल्या होत्या, त्यावर ‘झटका डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या ८० हजार तक्रारींबाबत अश्विनी भिडे यांनी शंका व्यक्त केली. कार शेड तिथून हटवा, झाडे तोडू नका, अशा एकाच प्रकारच्या तक्रारी होत्या. खऱ्या तक्रारी असतील तर त्याबाबत काही आक्षेप नाही, परंतु संख्या वाढवून दाखविणे, हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करणारी माणसे आहेत का, अशी शंका घ्यायला वाव आहे. तरीही मेट्रो कारशेडसाठी आरेची जागा का निवडली, झाडे तोडली तर भरपाई म्हणून आम्ही काय करणार आहोत, याबाबत त्या सर्व ८० हजार तक्रारींना उत्तरे दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, मुंबई मेट्रो ३च्या अधिकृत हॅण्डलवरून प्रकल्पातील वृक्षतोडीला समर्थन देणाऱ्या मॅनेज भाजप आणि आरएसएस संबंधित लोकांना प्रसिद्धी देण्यात येते आहे. तसेच त्यासाठी #AareyAikaNa या अभियानाला फूस लावली जातं आहे. मुंबईकरांच्या ८० हजार तक्रारींवर शंका घेणाऱ्या अश्विनी भिडे यांना भाजप आणि आरएसएस’चे हे मॅनेज लोक प्रांजळ मनाचे वाटत असावेत. वास्तविक अश्विनी भिडे यांच्याच हेतूवर सध्या मुंबईकर शंका घेत आहेत आणि मुंबई मेट्रो ३च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मुंबईकरांविरुद्ध प्रोपोगंडा राबविण्यात येत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं असून ते भीषण आहे असं त्यांचं ठाम मत आहे. मुंबईकरांच्या तक्रारी आणि त्यांच्या नीतीवर थेट शंका घेत सत्ताधारी आणि प्रशासनातील लोकांची हातमिळवणी झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.

सध्या समाज माध्यमांवर जोर धरत असून त्यासाठी नेटकरी देखील हॅशटॅग #SaveAareyForest अभियान राबवत असून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान या अभियानात अनेक राजकीय पक्ष देखील उतरले असून त्यांनी देखील जनसुनावणी पासून सर्वच विषयांवर सहभाग नोंदवून वृक्षतोडीला विरोध केला आहे. यांमध्ये मनसे अग्रस्थानी असून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ह्यांनी सुद्धा ह्या वृक्षतोडीला विरोध केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ह्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

मात्र यात एक धक्कादायक गोष्ट घडली आणि अचानक अनेक सामान्य मुंबईकरांचा एक गट हजर झाला आणि आम्ही सामान्य मुंबईकर या वृक्षतोडीला समर्थन करत आहोत असं वातावरण निर्माण करू लागले आहेत. दरम्यान, सरकारच्या मर्जीतले काही अधिकारी व पत्रकार ह्या झाडांच्या कत्तलीला सर्मथन करणाऱ्या हा गटाला सरळ पाठिंबा देत आहेत.

मात्र त्यामध्ये एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते, आरएसएस संबंधित कार्यकर्ते आणि संघटनांना हाताशी धरून एक वेगळीच हवा निर्मिती करून मुंबईकरांचे #SaveAarey अभियान हाणून पाडण्यासाठी सामान्य मुंबईकर म्हणून मुखवटा घालून आपलीच लोकं पाठवली आहेत.

बांद्रा येथील मेट्रोच्या प्रशासकीय कार्यालयाजवळ शुक्रवारी आरेमधील वृक्षतोड च्या विरोधात असणारे सामाजिक कार्यकर्ते जमा झाले होते पण त्याआधीच काही मॅनेज केलेले लोक देखील हजर होते. ह्यांची संख्या अंदाजे ४०च्या घरात होती. मात्र ह्यांना त्यांच्या पक्षासंबंधित प्रसार माध्यमांनी आणि मुंबई मेट्रोच्या अधिकृत हॅण्डल ने वारेमाप प्रसिद्धी दिली व मुंबईकरांचा पाठींबा आहे ह्या वृक्षांचे खून पाडायला अश्या बातम्या चालविल्या. विशेष म्हणजे याच प्रकल्पाची जवाबदारी असलेल्या अधिकारी अश्विनी भिडे ज्या सामान्य नागरिकांना याच विषयावरून कधीच भेटत नाहीत त्यांनी याच मॅनेज लोकांना विशेष भेट देऊन फोटोसेशन देखील केल्याचं समोर आलं आहे. संबंधित नियोजनबद्ध घडवलेला प्रकार अत्यंत धक्कादायक असून मुंबईकरांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचं सांगत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात SaveAarey अभियानाला कधीच प्रसिद्धी न देणाऱ्या अधिकारी अश्विनी भिडे याच वृक्षतोडीला समर्थन करणाऱ्या लोकांना मुंबई मेट्रो३ या अधिकृत ट्विटर पेजवरून प्रसिद्धी देताना दिसल्या हा ऐतिहासिक योगायोग म्हणावा लागेल.

संपूर्ण चौकशी असता हे विशेष मुंबईकर होते कोण ? तुम्हाला माहित आहे का ? तर नाही कारण तुम्हाला ते जागृत आणि प्रामाणिक प्रसार माध्यमचं दाखवतील आणि दरबारी मीडिया वेगळंच चित्र निर्माण करतील. त्यातील सर्व जण हे भाजप व RSS ह्यांच्याशी निगडित असल्याचं सिद्ध झालं आहे. ह्यां खास लोकांना जेव्हा महाराष्ट्र टाईम्स ह्या वृत्तपत्राच्या पत्रकार अनुजा चवाथे ह्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा अक्षरशः टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालं. त्यातील काहींना तर आपण नेमकं कशासाठी आलो आहोत हेच सांगता येत नव्हते, सगळे उचलून आणलेले होते.

आता त्यात सहभागी असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते ह्यांचा पंचनामा;
१ . भटू सावंत: संस्था – जागृत भारत मंच आणि खरी ओळख मुंबई “तरुण भारत” पेपरचे पत्रकार
२. मधू कोटीयन: संस्था – मुंबई रेल्वे प्रवासी संघ आणि खरी ओळख हि संघटना भाजपच्या रेल्वे आघाडीचा एक भाग आहे
३. भूषण मर्दे: संस्था – मंथन संस्था आणि खरी ओळख संघ स्वयंसेवक
४ .कैलास वर्मा: संस्था – रेल्वे प्रवासी संघटना आणि खरी ओळख भाजप कार्यकर्ते
५ . विशाल टिबरेवाल: संस्थ – ग्रीन ट्रिब्युनल आणि खरी ओळख RSS नमो भक्त
६. नाव माहित नाही मात्र निवेदन देताना एक महिला दिसत आहे जी वांद्रे मधील भाजप कार्यकर्ती आहे.

मुंबईमेट्रो-३ या ट्विटर पेजने ज्या ग्रीन ट्रिब्युनल संस्थेच्या विशाल टिबरेवाल यांना प्रसिद्धी दिली ते स्वतः RSS वाले आहेत. त्याचे खाली पुरावे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x