20 April 2025 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

काही दिवस सामना अग्रलेखचे विषय | मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस

BJP MLA Nitesh Rane, Saamana Newspaper

मुंबई, २० ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वपूर्ण निकाल दिला. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. यानंतर महाविकास आघाडीत शिवसेना सर्वाधिक अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी सामनाच्या या अग्रलेखवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय :1.) मराठी अस्मिता, 2.) महाराष्ट्र धर्म, 3.) मराठी माणूस Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा Dino, Jacqueline, disha पाहिजे असतात..वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस!,” असे ट्विट करत नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे.

 

News English Summary: BJP MLA Nitesh Rane has now targeted the Mahavikas Aghadi government and Shiv Sena over the headline of the match. Nitesh Rane tweeted in this regard. Now for the next few days, the subject of the front page article is Marathi Asmita, Maharashtra Dharma, Marathi Manus, while doing night life, he did not see a Marathi man or a Marathi artist.

News English Title: Now next few days will be subject headline match BJP MLA Nitesh Rane Sharp criticism News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या