काय आहे दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली | जाणून घ्या
मुंबई, २३ ऑगस्ट : यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. राज्यात आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेकडून गणेश विसर्जनसाठी नियमावली:
घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.
- मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे.
- नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्त मनुष्यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील गर्दी कमी होण्यासाठी महापालिकेच्या 24 विभागांमध्ये सुमारे 170 कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई असल्याने सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.
- महापालिकेच्या प्रत्येक विभागांतर्गत 7 ते 8 गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्त्यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
- प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सिल्ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
- मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा आणि आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
- महापालिकेने विशेष व्यवस्था म्हणून ट्रकवर टाक्या किंवा इतर व्यवस्था करुन फिरती विसर्जन स्थळे (mobile spots on wheel) निर्माण केलेली आहेत, त्याचाही लाभ भाविकांनी घ्यावा.
- यंदा गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्यावी.
- विसर्जना दरम्यान सामाजिक अंतर (social distancing), मास्क /मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्यादी आरोग्य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
दुसरीकडे नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोन भागात महापालिकेची एक विशेष गाडी घरोघरी फिरुन बाप्पाच्या मूर्तीचं संकलन करणार आहे. त्यानंतर गणेश मूर्तींचं महापालिकेच्या स्वयंसेवकांकडून विधीवत विसर्जन केलं जाणार आहे.
गणपती बाप्पाच्या विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून 23 मुख्य विसर्जन तलावांच्या जोडीला 135 कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या गाड्या कंटेन्मेंट झोन भागात फिरुन विसर्जनासाठी मूर्ती संकलित करणार आहेत
News English Summary: Ganpati will be immersed in the state for one and a half days today. Mumbai Municipal Corporation has appealed not to immerse the idol directly in the sea to avoid crowds on the backdrop of the corona. Also collect Ganesha idols, such instructions have been given by the municipality.
News English Title: One and half day Ganesh Visarjan BMC guidelines News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER