22 April 2025 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक | फडणवीसांची टीका

Opposition leader Devendra Fadnavis, Thackeray Government, Arnab Goswami

मुंबई, ४ नोव्हेंबर: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.

तसेच अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सध्या पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सदर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे. आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केला आहे.

 

News English Summary: Opposition leader and former chief minister Devendra Fadnavis has also tweeted criticizing the Thackeray government. The emergency ended in 1977, but the mentality remains. The Shiv Sena and the Congress, which support the emergency, are displaying the same mentality together. Attempts to suppress every voice against the government is dangerous for democracy. The slogan of India is to fight against every such oppression, tweeted Fadnavis.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis criticized Thackeray Government after Arnab Goswami arrest news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या